मी, बबन अंबाजी शेलार. राहाणार पोलादपूर तालुक्यातील भोगाव बुद्रूक जि.रायगड. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे या विद्यापीठमधून मी राज्य शास्त्र विषय घेऊन बीए ही पदवी संपादन केली आहे. पुणे येथे नोकरी करत असतेवेळी १९८४ साली पुण्यात मी पश्चिम पोलादपूर रहिवाशी संघ (रजि) ही समाज बांधवांची संघटना स्थापन करण्यात आणि या संघटनेची बांधणी करण्यात पुढाकार घेतला. या संस्थेचा विश्वस्त तसेच प्रथम उपाध्यक्ष म्हणून ही काही काळ काम केले. यानंतर अपरिहार्य कारणस्तव मी व कुटुंब मुळगावी आलो. येथे आल्यानंतर साप्ताहिक प्रवाह, शिवतेज, सागर,सामना, प्रहार, आणि आपलं महानगर या दैनिकांमधुन गेली तीस वर्षे पत्रकारिता केली आहे. मात्र वयपरत्वे २०२० पासून मी माझे स्वतःचे "बबन शेलार टॉक शो" हे युट्यब चॅनल चालवित आहे. आपले कोकण प्रतिष्ठाण (रजि ) या संस्थेचा रायगड प्रमुख पदावर कार्यरत असून. त्याच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अनेक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. पत्रकारीतेच्या माध्यमातून मी नेहमीच बहुजन समाजाच्या व्यथा वेदना सातत्याने मांडल्या प्रसंगी यथा शक्ति सहकार्य व मदत केली आहे.
संपर्क : +918080840208
ईमेल : bshelar891 @gmail.com
0 टिप्पण्या