Ticker

6/recent/ticker-posts

दरवर्षी नियोजनबद्ध वणवे कसे लागतात यामागील रहस्य कोणते ?

दरवर्षी नियोजन बद्ध वणवे कसे लागतात या मागील रहस्य कोणते ?

शासनाची उदासीनता, प्रशासनाची अनास्था आणि नेत्यांची दुर्लक्षता यामुळे पोलादपुरकरांच्या नशीबी वणव्याचे संकट ओढवत आहे .
पोलादपुर तालूक्यातील सहयाद्रीच्या डोंगररांगा वणव्याच्या आगीच्या विळख्यात सापडून भस्मसात झाल्या आहेत पर्यावरणाच्या ऱ्हासा बरोबरच जैविकविविधधतेचा नाश झाला आहे. मागील दोन चार वर्षांचा मागोवा घेतला तर पोलादपुर वणव्याच्या आगीत गुरांच गोठे त्यातील जनावरे जळून मृत्यु झाल्याचा घटना घडल्या आहेत.  यावेळी तर लागलेले वणवे गाव वाड्यांपर्यंत पोहोचले आहेत.  दोन दिवसांपूर्वी देऊळकोंड आगीत पोलसह केबल्स जळून खाक झाल्या आहेत. काल परवा कापडे खुर्द येथील सपाट जमिनीवर वणवा लागला. अशा घटना घडत असते वेळी एवढया मोठ्या प्रमाणावर दर वर्षी पोलादपुर तालुक्याची हानी करून कोणाचा फायदा होणार आहे यामागील शोध घेता असे स्पष्ठ दिसून येते कि, मुंबई गोवा महामार्गाच्या पासुन २० किलोमीटर अंतराच्या घेऱ्यात तालूका सामावतो त्यामुळे धन दांडग्यांचे रिअल इस्टेट कंपन्यांचे  लक्ष व  दलालांचे लक्ष वेधले आहे जेव्हां मुंबई गोवा महामार्गाची नुसती आवई उठली होती तेव्हां धन दांडग्यांचा मोर्चा इकडे वळला होता. त्यांच्या पिळावलीचा जथ्या दुय्यम निबंधक कार्यालयासमोर आणि भुमि अभिलेख कार्यालयासमोर दिसून यायचा तेव्हां ही १५ ते २० हजार एकरी अशा कवडी मोल दराने डोंगर दऱ्या वरकस जमिनींच्या खरेदींचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाले. आताही होत असून अलीकडे एका पूर्ण गावातील शेतकऱ्यांच्या जमिनींचा  दोन लाख एकरी दराने खरेदी विक्रीचा व्यवहार कायदयाच्या चौकटीत राहून करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे.
मुळातच दरवर्षी होणाऱ्या पर्यावरण आणि जैव विविधतेच्या प्रचंड प्रमाणा वरिल ऱ्हासामुळे वातावर- णातील झालेल्या बदलामुळे निसर्गाचे ऋतुचक्र बिघडले आहे जुनच्या अगोदर कधीही अवकाळी पाऊस पडत आहे. दरवर्षी अति वृष्ठी होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे
येथील राने, जंगले तसेच देवराई नष्ट होत आहेत. या कारणांमुळे भात पीकापासून मिळणारे उत्पादन आणि शेतीसाठी केलेला खर्च याचा ताळमेळ बसतना ही याचाच फायदा घेत स्थानिक दलालांच्या माध्यमातून हतबल झालेल्या येथील शेतकऱ्या कडून शेतजमिनी विकत घेण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणावर भात शेती करण्याचे सोडून दिलेल्या ओसाड शेतजमिनी शेतकऱ्याकडून. धनदांगडे, बिल्डर्स रिअल इस्टेट कंपन्याकडून विकत घेतल्या जात आहेत. आतापर्यंत हजारो हेक्टर जमिनीचे क्षेत्र विकले गेले असून  या सर्व व्यवहारात शासकिय अधिकाऱ्यांचे हात गुंतले आहेत. त्यामुळे तालुक्यात जमिनी खरेदी विक्रीच्या व्यवहारातील लोकांवर ग्रामीण भागातील जनतेकडून संशय व्यक्त होत आहे. दुसरे असे कि येथील गावांमधील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर नोकरी उद्योग व्यवसायानिमित्त शहरात असल्यामुळे गावी असलेल्या वृद्ध आई वडील व अन्य नातेवाईकांचा बुद्धीभेद करून अनेक प्रकारे जमीन विक्रीस भाग पाडले जात आहे त्यामुळे वणव्याच्या आगी मागील शेतजमिनीच्या खरेदीचे कटकारस्थान असण्याचे ही एक कारण पुढे आले आहे.


भाग १ पुर्ण




बबन शेलार (मुख्य संपादक )

संपर्क : ८०८०८४०२०८

ईमेल : bshelar891@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या