Ticker

6/recent/ticker-posts

पोलादपुर तालुक्यात भीषण पाणी टंचाई उद्भभवली ?

पोलादपुर तालुक्यात भीषण  पाणी टंचाई उद्भवली  ? ८५ गावे १५९ वाड्या पाणी निवारण टंचाई कृती आराखड्यात

महिलेच्या डोक्यावरचा हंडा कंबरेवर आणण्याच्या प्रयत्नात अनेक राजकिय पक्षांची सरकारे सावित्री नदीच्या पात्रात गडब झाली. या प्रदीर्घ काळात पथदर्शी कार्यक्रमापासून आताच्या जल जीवनयोजने पर्यंत अनेक महत्वाकांक्षी पाणी टंचाईच्या योजना काळाच्या उदरात गायब झाल्याचाही अनुभव पोलादपूरकरांनी  घेतला असला तरी ना महिलेच्या डोक्यावरचा हंडा उतरला ना त्यांच्या नशीबी दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी सहयाद्रीच्या डोंगर रांगांच्या डागा चढ उतार करत करावी लागणारी पायपीट काही चुकलेली नाही.
आजचे वास्तव
डोंगराळ पोलादपुर तालुक्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी लोहारे, पार्ले, सवाद, हावरे, माटवण अशी गावे ।वगळली तर माथ्यावर कुशीत आणि पायथ्याशी गाववाड्या वस्त्या वसलेल्या आहेत. या गावांच्या दुर्गम अतिदुर्गम भागातील दऱ्याखोऱ्यात ओढे नाले उपनद्या यांच्या बाजुला विसावल्या आहेत
मात्र आता मार्चच्या अखेरीस डोक्यावर प्रखरपणे तळपणाऱ्या प्रचंड आग ओकणाऱ्या सुर्यामुळे काही विहीरींतील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे तर काही कोरड्या ठाक पडल्या आहेत तर काही विहीरी मधील गाळ उपसून पाण्याचे उद्भवणाऱ्या  झऱ्यांना मोकळा श्वास घेऊ देण्याची गरज आहे. तालुक्यात कित्येक वर्षापासून रायगड जिल्हा परिषदेकडून विंधन विहीरी (बोअरवेल ) मारल्या आहेत मात्र आज या बोअरवेल्च्या तोट्या मुग गिळून गप्प झाल्या आहेत. त्यामुळे महिलांना  हंडा भर पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागले असून रानोमाळ वाटा तुडवित पाणी मिळवावे लागले आहे.
या दहा पंधरा वर्षात प्रत्येक गाव वाडयावर नळपाणी पुरवठा योजना पोहोचली असली तरी त्यापैकी काही या महिन्यातच पाणी आटले आहे. तालुक्यात सावित्री, ढवळी, घोडनदी, कामथी, चोळई या पाच मुख्य नद्या व त्यांना जोडणाऱ्या उपनद्या वाहातात. या नद्यांच्या काठावरून फिरल्यास नद्यांचे पात्र वाळवंट झाले आहे तर डोहांचे पाणी आटले आहे तसेच शेवाळले आहे त्यामुळे आजचे हे भीषण स्वरूप समोर आले आहे
तालुक्यात रानबाजीरे येथे धरण आहे मात्र आठ दहा गावे वगळता इतर गाव वाड्यांना त्याचा काडीचाही फायदा नाही असे म्हणावे लागेल फायदा एवढाच टॅकरने पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याचा उपयोग झाला आहे.
कित्येक वर्षांपासून येथील काही दुर्गम भागात तीन चार धरण मंजूर झाली असली तरी काही धरणाचे काम कागदावर आहे तर पूर्वी कधी झालेले धरणाला पावसाळ्यात गळती लागते या धरणांपैकी काही अद्याप अपूर्ण अवस्थेत आजारी आहेत तर काहीं शेतजमिनी संपादीत झाल्या आहेत, मात्र या धरणांच्या काठावरच्या शेतजमिनी बाहेरच्यानी घेतल्या होत्या त्यांच्या पैशांची गुंतुवणूक त्यांच्या मनातील स्वप्नांचे मांडे धुसर झाले आहे.
येथील जनता उन्हाळ्यात व पावसाळ्यात उसाच्या चरख्यात पिळणाऱ्या उसासारखी अनेक संकटे व समस्यांना कडवी झुंज देत ताठ कण्याने उमेदीने उभी आहे ती केवळ तालुक्याचा वैभवशाली वारसा व संस्कृतीमुळे
नुकतीच येथील जल जीवन योजनेची माहिती घेतली तर तालुक्यात एकूण ९३ गाव वाड्यावर ही केंद्र सरकारची महत्वाकांशी योजना राबविण्यात येत आहेत, यापैकी ४७ पूर्ण झाल्या आहेत तर धनगरवाडी मोरगीरी फौजदार वाडीच्या योजनेला मंजूरी मिळाली असली तरी वर्क ऑर्डरच्या सापळ्यात लटकलेली आहे तर एका योजनेचे काम सुरू नाही तसेच ४ ८ योजना अपुर्ण आहेत हे वास्तव चित्रण आहे आता तालुक्यातील प्रत्येक क्षेत्रातील बुद्धीजीवी व्यक्तींनी तालूक्याच्या विकासासाठी एकवट्याची गरज आहे.



बबन शेलार (मुख्य संपादक )

संपर्क : ८०८०८४०२०८ 

ईमेल : bshelar891@gmail.com


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या